Products

कडधान्य आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र आजच्या धकाधकीच्या म्हणण्यापेक्षा ‘फास्ट फूड’च्या युगात घरातूनच काय तर हॉटेलमधून कडधान्याची हकलपट्टी झाली आहे. कडधान्याच्या अभावामुळे मानवाच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतांना आपल्याला दिसत आहे. कडधान्यातील विशेष म्हणजे ते जास्त शिजविल्यानंतर देखील त्याच्यातील पोषकतत्वे कायम राहतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वे असतात.

काही महत्त्वाची कडधान्य:

तूर डाळ :

तूर हे एक द्विदल धान्य आहे. तुरीच्या रोपाला शेंगा लागतात. तुरीमध्ये २२ प्रथिने, ५८ कर्बोदके नगण्य प्रमाणात तंतू आणि स्निग्ध पदार्थ असतात. तूर डाळीत खनिज, कार्बोहाइड्रेट, लोहयुक्त खनिज, कॅल्शियम यांचे योग्य प्रमाण असते. तूर डाळ पचण्यास सोपी जाते. लहान बालकांना तूर डाळीचे पाणी पिण्यास देतात. तसेच आजारी व्यक्तिस तूरीच्या डाळीची खिचडी खाण्यास देतात. मात्र दमा व वाताचे आजार असणार्‍या व्यक्तिंना तूर डाळीपासून त्रास होतो.

हरभरा :

हरभरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो .हरभऱ्यापासून डाळ, बेसन तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते . हरभरे व हरभर्‍याची डाळ मानवी आरोग्यासह सौंदर्यास देखील उत्तम आहे. यात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला व काविळ या आजारावर लाभदायी असून हरभर्‍याच्या डाळीचे पीठ केस व त्वचेच्या सौंदर्यावर गुणकारी असते.